मोटारीचा चाक पायावर घालून वाहतूक पोलिसाला केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:50 IST2017-08-17T23:49:54+5:302017-08-17T23:50:12+5:30
पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या आयटी पार्क हिंजवडीच्या शिवाजी चौकात कार्यरत आसलेल्या वाहतूक

मोटारीचा चाक पायावर घालून वाहतूक पोलिसाला केले जखमी
हिंजवड़ी : (पिंपरी-चिंचवड़) दि १७ - पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या आयटी पार्क हिंजवडीच्या शिवाजी चौकात कार्यरत आसलेल्या वाहतूक पोलिस कर्मचा-याच्या पायावर मोटारीचा चाक घालून त्याला जखमी करुण त्यालाच धक्का-बुक्की करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला .
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात मल्हारी भीमराव वाघमारे यांनी फिर्याद दिल्यानंतर विद्याधर मधुकर औताडे (रा. डोंनगांव, सोलापुर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत हिंजवड़ी पोलिसांनी दिलेली माहिती अशी वाघमारे हे शिवाजी चौकात वाहतूक नियमन करीत असता औताड़े हा एमएच १४, एफसी २२०६ ह्या क्रमांकाच्या मोटारीतुन नो एन्ट्रीतुन निघाला त्याला अडविन्यासाठी वाघमारे पुढे गेले असता त्याने चाक पायावर घालत त्यांना जखमी केले वाघमारे यांनी गाडीवर हाताने थाप मारल्याने, कॅब चालक विद्याधर अवताडेने वाघमारे यांच्या छातीत बुक्कीने मारहाण करून शिवीगाळ केली. अरेरावी केली