पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:32 PM2019-07-19T19:32:25+5:302019-07-19T19:33:17+5:30

नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. 

What's app use for to improve pits of pimpri : appeal to citizens |  पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन 

 पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन 

Next
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात पावसामुळे खड्डे पडलेले

 पिंपरी :  शहरात विशेषत: पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बजविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. सूचना देऊनही खड्डे न बुजविल्यास तक्रार करण्यासाठी महापालिकेने व्हॉटस अ‍ॅप क्रमांक दिले आहेत.  
नागरी सुविधा केंद्र, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, ह्यह्यनागरीकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचीत कार्यवाही व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवाहन करीत आहे. आपल्या भागात  असलेल्या भागात पावसाळ्यात खड्डे पडल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास तसेच परिसर अस्वच्छ असल्यास त्या ठिकाणांचे फोटो व संपुर्ण पत्ता अशी माहिती ९९२२५०१४५० या मोबाईलवर, तक्रार सारथी हेल्पलाईन ( ८८८८००६६६६ ) पाठविण्यात यावी. नागरिकांच्या समस्याचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ह्णह्ण

Web Title: What's app use for to improve pits of pimpri : appeal to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.