शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणावं...! पोलीस अधिकाऱ्यानेच पळविले तक्रारदार तरुणीचं ब्रॅण्डेड कंपनीचं घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 21:52 IST

भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी २५ वर्षीय संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली होती.....

पिंपरी : तक्रारदार तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि चहा पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून महागडे घड्याळ चोरी केल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि ३०) त्या बाबतचे आदेश दिले.

प्रशांत राजेंद्र रेळेकर असे निलंबित फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी संबंधित तरुणी २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली होती. तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. दरम्यान, त्याने गाडीमध्ये तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो. मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन. मी उद्या मिरजेला चाललो आहे. तू पण माझ्या सोबत चल, असे म्हणाला. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला. 

गाडी तरुणीच्या घराजवळ पोहचल्या नंतर रेळेकर याने कंटाळा आल्याचे सांगत चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले. त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होती. चहा पिताना रेळेकरने चार्जिंगला लावलेले अँपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले. तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकर याने तरुणीचे घड्याळ परत दिले. रेळेकरमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा  ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. या बाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. 

-----कोणताही अधिकारी सामान्य नागरिकांना त्रास देत असेल, त्यांच्याशी गैर वर्तणूक करीत असल्यास त्यांची गय केली जाणार नाही. माझ्याकडे चुकीला माफी नाही. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्तtheftचोरीsuspensionनिलंबनWomenमहिला