शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जवानांनी रोखल्या कचऱ्याच्या गाड्या

By admin | Updated: August 18, 2015 03:38 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभाग व देहूरोड लष्करी भागात जमा होणारा कचरा दारूगोळा कोठाराजवळ टाकण्यास स्थानिक लष्कराने मज्जाव केला आहे.

देवराम भेगडे, देहूरोडकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभाग व देहूरोड लष्करी भागात जमा होणारा कचरा दारूगोळा कोठाराजवळ टाकण्यास स्थानिक लष्कराने मज्जाव केला आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या व इतर वाहने रोखल्याने चार दिवसांपासून घरातला कचरा घरातच ठेवण्याची वेळ आल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नागरिक हैराण आहेत. सार्वजनिक ठिकाणीही कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. कचरा टाकण्याच्या ठिकाणी (डेपो) योग्य ती उपाययोजना करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील असून, त्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जात असून, लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे सूत्रांनी सांगितले. बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांत घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी एकूण सहा घंटागाड्या ठेकेदारामार्फत प्रशासनाने नेमल्या असून, देहूरोड लष्करी भागातील वसाहतीत एकूण तीन घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक दोन वगळता सर्व सहा प्रभागांत इतर कचरा गोळा करण्यासाठी पाच ट्रॅक्टर भाड्याने घेतले आहेत. प्रभाग दोनमध्ये व लष्करी भागात विविध ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी बोर्डाच्या दोन कचरा गाड्यामार्फत कचरा नियमित गोळा करण्याचे काम करण्यात येते. जमा होणारा सर्व कचरा बोर्डाच्या निगडी जकात नाक्याजवळील लष्कराच्या मोकळ्या जागेत गेली अनेक वर्षे टाकण्यात येत आहे. कचऱ्याच्या डेपोपासून जवळच लष्कराचे देहूरोड दारुगोळा कोठार असून, कचऱ्याचा त्रास होत असल्याने बोर्डाला एक महिन्यापूर्वी पत्र पाठवून कचरा डेपो सध्याच्या जागेवरून हटविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र निगडीतील परमार कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या मैदानात सर्व कचरा गोळा करण्याबाबत लष्कराने सुचविले असून, सदर जागा नागरी वस्ती, लष्करी अभियंता पाणीपुरवठा केंद्र व महामार्गालगत असल्याने अद्याप त्या ठिकाणी कचरा डेपो हलविण्याचा निर्णय झाला नसल्याचे समजते. जवानांनी बोर्डाच्या सर्वच कचरा गाड्या कचरा डेपोकडे जाण्यापासून रोखल्या आहेत.(वार्ताहर)