शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा’

By admin | Updated: August 10, 2015 02:50 IST

पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते

पवनानगर : पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते? सत्तेत असताना एक व विरोधी पक्षात असताना एक, असे खोटे राजकारण मावळची जनता सहन करणार नाही, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी आमदार भेगडे बोलत होते.ते म्हणाले, ‘‘सरकारने शब्द देऊन तीन वर्षांत मृतांच्या नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. भाजपा-सेना सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील नातेवाइकांना नोकरीत घेण्यासाठी आदेश काढला आहे. शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि ते मागे घेतले जातील. कांताबाई ठाकर या नितीनच्या एकट्याच्या आई नसून, पाण्याच्या लढ्यासाठी त्याचे बलिदान गेले आहे. त्यामुळे त्या मावळच्या आई आहेत. या शहिदांचे पुण्यस्मरण हे प्रत्येक वेळी करण्यात येईल.’’या वेळी मावळचे माजी सभापती व पवना बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पाणी हे मावळचे वैभव असून, कोणालाही कदापि बंद जलवाहिनीने नेऊ देणार नाही.’’ या वेळी बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, लक्ष्मण भालेराव, शांताराम भोते आदींची भाषणे झाली. या वेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, गुलाबराव वरघडे, पांडुरंग ठाकर, गणेश गायकवाड, रघुवीर शेलार, प्रशांत ढोरे, सुकन बाफना अमित कुंभार, किसन खैर उपस्थित होते. (वार्ताहर)