शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या

By नारायण बडगुजर | Updated: April 29, 2025 18:23 IST

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत नागरिकांना पाणयासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यासाठी धरणांमधीलपाणी राखीव आहे. मात्र, पीएमआरडीए हद्दीसाठी कोणत्याही धरणातील, तलावातील पाणी आरक्षित नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. 

पीएमआरडीएची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली असून ६०५१.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. नऊ तालुक्यांत विस्तारलेल्या पीएमआरडीएमध्ये ६९७ गावांचा समावेश आहे. २०११ मधील जनगणनेनुसार ७३ लाख २१ हजार ३६७ इतकी लोकसंख्या आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यासाठी वेगवेगळ्या धरणांमधून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाणी  मात्र, या नागरिकांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. 

महापालिका हद्दीलगत तसेच शहरांलगत पीएमआरडीए हद्दीत रहिवासी प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. संबंधित ग्रामपंचायतींकडून या प्रकल्पांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकांनी त्यांच्या हद्दीलगत पाच किलोमीटरमधील रहिवासी प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याचे शासन निर्देश आहेत. मात्र, महापालिका हद्दीतच पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिका हद्दीलगत असलेल्या पीएमआरडीए क्षेत्रातील रहिवाशांनापाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  

महापालिका प्रशासन उदासीन

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते. पाणीपुरवठा नसल्याने नवीन प्रकल्पांना बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका पीएमआरडीए प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, शासनाकडे याबाबत धाव घेण्यात आली. त्याबाबत  महापालिका प्रशासनात पाणी प्रश्नावरून जुंपली होती.  

उपाययोजना कोण करणार?

पाणीप्रश्न बिकट असला तरी दोन्ही महापालिकांच्या हद्दीलगत मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी किती पाण्याची आवश्यकता आहे, याबाबत पीएमआरडीए प्रशासनाने तज्ज्ञांकडून माहिती घेतली. त्यानुसार महापालिका हद्दीलगतच्या या प्रकल्पांसाठी दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पीएमआरडीएकडे सध्या कोणतीही उपाययोजना नाही. 

यंत्रणांकडून दुर्लक्ष

महापालिकांसह जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकण, एमआयडीसी या यंत्रणांकडून नागरिकांसाठी, विविध प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी पीएमआरडीए हद्दीत उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याकडे या यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे.  

रहिवासी प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार संबंधित महापालिका किंवा यंत्रणांकडून पाणीपुरवठा केला जात आहे. पीएमआरडीए कार्यक्षेत्रासाठी आणखी पाण्याची आवश्यकता आहे. -डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएDamधरणWaterपाणीTemperatureतापमानMuncipal Corporationनगर पालिका