शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नगरसेवकांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:18 IST

महापालिकेत बैठक : नागरिकांच्या प्रश्नांनी वैतागले लोकप्रतिनिधी

पिंपरी : पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे वॉर्डातील नागरिकांच्या प्रश्नांचा रोजच भडीमार होत आहे. अधिका-यांना सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी झाल्याची लाज वाटते. आतातरी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी करताना सत्ताधारी भाजपाच्या दोन नगरसेवकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिक वैतागले आहेत. दररोज सारथीवर अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत शनिवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे व काही नगरसेवक व नगरसेविका बैठकीला उपस्थित होत्या.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही, तोच शहरातील सर्वच भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज ४७० एमएलडी पाणीपुरवठा होत असताना, ऐन गणपती उत्सवात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तर पुढील महिन्यात नवरात्र, त्यानंतर दिवाळीचा सण आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौरांनी येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.रोजच्या अपुºया पाणी पुरवठ्यामुळे नागरिक आम्हाला विचारणा करतात. त्यांना उत्तरे देता-देता नाकी नऊ येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करताना सत्ताधारी भाजपाच्या पिंपळे सौदागर व पिंपळे निलख भागातील नगरसेवकांच्या डोळ्यांत बैठकीतच अक्षरश: अश्रू तरळले. .शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या कालावधीत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शहरात चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे विचारधीन आहे. त्यामुळे दररोज ६० एमएलडी पाण्याची बचत होणार असून, अन्य भागात पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होऊ शकतो.- राहुल जाधव, महापौर४शहरातील अनधिकृत बांधकामधारक मोठ्या प्रमाणात मोटार पंपद्वारे पाणी खेचतात. तसेच अनधिकृत नळजोडही अधिक आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी नमूद केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड