शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:18 IST

आळंदीत पहिली रिंगण वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

पुणे : आपण सगळे वारकरी घरातून आलेलो आहोत. आपल्या मनावर या परंपरेचे पावित्र्य बिंबवलेले आहे. पण, कुणी त्याचा वापर करून समाजातील वातावरण बिघडवत असेल तर, ते आपण सहन करू नये, असे मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि रिंगण प्रकाशन यांच्या वतीने आळंदी येथे रविवारी (दि. १५) रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डुडुळगाव, आळंदी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ६८ स्पर्धकांनी भाग घेतला. संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव असलेली ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी खुली होती.

जगताप पुढे म्हणाले, वारकरी संप्रदाय वापर राजकारणासाठी एखाद्या भाडोत्री ट्रोलरसारखे करण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे. पण, आता त्याचा राजकारणासाठी वापर होतोय का, यावर संत विचारांना मानणाऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे.यश पाटील याने ११ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक तर, अभय आळशी याने ९ हजार रुपयांचे दुसरे पारितोषिक पटकावले. हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. हर्षदा शेरकर (बारामती), चैतन्य कांबळे (कोल्हापूर) आणि चैतन्य बावधने (पुणे) यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला. महेश उशीर (अहमदनगर), तेजस पाटील (कोल्हापूर), वृषभ चौधरी (सिन्नर), प्रणव जगताप (पुणे), प्रथमेश धायगुडे (रायगड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कोल्हापूरचे डॉ. आलोक जत्राटकर आणि आळंदीचे भागवत महाराज साळुंके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, 'रिंगण'चे संपादक सचिन परब, पुणे वक्तृत्व वाद मंडळाचे डॉ. पांडुरंग कंद आणि प्रवीण शिंदे यांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीvarkariवारकरी