ड्रेनेजचे काम सुरु असताना भिंत खचली, ढिगाऱ्याखाली मुलगा अडकल्याची भिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 18:02 IST2019-05-04T17:59:03+5:302019-05-04T18:02:10+5:30
कासारवाडीतील दत्तनगर येथे ड्रेनेजचे काम सुरु असताना एका इमारतीची सिमाभिंत खचली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली एक मुलगा अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ड्रेनेजचे काम सुरु असताना भिंत खचली, ढिगाऱ्याखाली मुलगा अडकल्याची भिती
पिंपरी : कासारवाडीतील दत्तनगर येथे ड्रेनेजचे काम सुरु असताना एका इमारतीची सिमाभिंत खचली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली एक मुलगा अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दत्तनगर येथील विघ्नहर्ता क्रियेचर सोसायटीच्या इमारतीलगत शनिवारी दुपारी ड्रेनेजचे काम सुरु होते. यावेळी या इमारतीची सिमाभिंत अचानक खचली. दरम्यान, याठिकाणी ड्रेनेजचे काम करणारया कामगारांसह एक मुलगा या ढिगारयाखाली अडकला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन कामगारांना बाहेर काढले. मात्र, अद्यापही या ढिगारयाखाली एक मुलगा अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या जवानांसह स्थानिक नागरिक ढीग हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
(उर्वरित माहिती थोड्याच वेळात )