कामावरून काढले, पोलिसांकडे निघालेल्या मालकाला भोसकले, वाकडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:30 IST2023-12-28T14:29:22+5:302023-12-28T14:30:28+5:30
वाकड मधील वाय जंक्शन जवळ भुमकर चौकात सोमवारी (दि. २५) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली....

कामावरून काढले, पोलिसांकडे निघालेल्या मालकाला भोसकले, वाकडमधील घटना
पिंपरी : ट्रकवरील कामगाराला कामावरून काढून टाकण्याच्या कारणावरून कामगाराने ट्रक मालकासोबत वाद घातला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला कामगाराने धारदार शस्त्राने भोकसले. वाकड मधील वाय जंक्शन जवळ भुमकर चौकात सोमवारी (दि. २५) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
शिवाप्पा आप्पा अण्णा अडागळे (वय ४२, रा. मुकाई चौकाजवळ, किवळे) असे जखमी मालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार दिगंबर शिवाजी गायकवाड (२८, रा. डुडुळगाव, आळंदी रोड, ता. हवेली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिगंबर फिर्यादी अडागळे यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. त्याला कामावरून काढण्याचा अडागळे विचार करत होते. त्या कारणावरून तो अडागळे यांचा टेम्पो घेऊन जात होता. अडागळे यांनी गायकवाडला टेम्पो घेऊन जाण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने अडागळे यांना शस्त्राने डोक्यात मारून जखमी केले.
या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी शिवाप्पा अडागळे पोलिस ठाण्यात जात होते. भुमकर चौकात आले असता गायकवाडने त्यांना अडवून धारदार शस्त्राने भोकसले. यामध्ये अडागळे गंभीर जखमी झाले.