शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 3:17 PM

प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही.

पिंपरी : काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे. पॉप्युलरपेक्षा परफॉरर्मिंग असायला हवे. कामातून माणूस ओळखला जावा, असे मत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड मधील तरुणाईंशी 'आदित्य संवाद' मध्ये व्यक्त केले. तसेच राजकारण, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षितता, बेरोजगारी असे युवकांचे सामाजिक प्रश्न जाणून घेतले. तरूणाईच्या प्रश्नांना ठाकरे यांनी वाट मोकळी करून दिली.पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील मैदानात आदित्य संवाद झाला. तरूणांच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या.  तरुणाईंच्या चौफेर प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यात सुरू झालेल्या आदित्य संवाद या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी सुधीर कावे, किर्ती काळे, अक्षय डोईफोडे, निलेश पिंगळे, महेंद्र चव्हाण, श्याम सुतार, ऋषभ म्हात्रे, ऋणाली देसाई, स्रेहा गोडसे, सचिन लांबुटे, रेश्मा चौधरी, सूरज म्हसे, राखी मल्या, योगेश शहा यांनी राजकारण, राजकीय नेता कसा असावा, शिक्षण, समाजकारण, राष्ट्रीय सुरक्षितता, बेरोजगारी, रॅगीग, तरूणांचे प्रश्न असे विविध विषयांवर प्रश्न विचारले. खासदारांना का निवडूण द्यायचे या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, गल्लीतील प्रश्न सोडविणे हे खासदारांचे काम नसून देशपातळीवरील प्रश्न जाणून घेणे आवाज उठविणे हे काम असते. बेरोजगारीवर ठाकरे म्हणाले,हा प्रश्न गंभीर होत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे. तरूणींच्या सुरक्षिततेवर ठाकरे म्हणाले, कोणी त्रास देत असेल तर प्रतिकार करायला हवा. त्यासाठी युवासेना प्रयत्न करीत आहे.

.........................

स्थिर मनाशी युतीमनसेशी युती करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ध्येय, समविचारी आहेत, त्यांच्याशी युती आहे. अर्थात भाजपाशी. जनहितासाठी युती असावी. प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही.

.........................ध्येयवेड्यांची स्वाक्षरी घेतली यावेळी मुष्टियोद्धा महेद्र चव्हाण, दुर्ग सर करणारा साई कवडे यांच्याशी गप्पा मारल्या. संवाद साधून या ध्येयवेड्याची आदित्य संवाद या कॅपवर स्वाक्षरी ठाकरे यांनी घेतली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड