शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:07 IST

तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी : तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                 शरद वसंत भालेकर (वय ३३, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर चव्हाण, वैभव वसंत चांदे, शुभम हनुमंत सरवदे, आकाश वसंत सरोदे, प्रतिक माणिक माने, रितेश वासुदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ फेबु्रवारीला शिवजयंती मिरवणुकीत शरद भालेकर यांचे मित्र ईश्वर भिलारे यांच्याबरोबर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन वादविवाद झाला होता. याचा राग मनात धरुन यातील आरोपी सागर चव्हाण याने रविवारी रात्री आठच्या सुमारास साथीदारांना बोलावून घेत भालेकर हे त्यांच्या घरासमोर बसलेले असताना त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या गळयातील ९५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकाविली. त्यानंतर भालेकर यांना लाकडी दांडक्याने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.            तर सागर शंकर चव्हाण (वय ३०, रा. विकास हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरद भालेकर (रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे), योगेश भुजबळ, लक्ष्मण भालेकर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागर चव्हाण हे त्यांचे मित्र शुभम हनुमंत सरोदे व अनिकेत गोडसे यांना मोटारीतून घेवून शुभम सरोदे यास त्याचे राहते घरी सोडविण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी शरद भालेकर याने चव्हाण यांच्या मोटारीवर दगड मारुन काच फोडली. तसेच कोयत्याने चव्हाण यांच्यावर वार केल्याने ते जखमी झाले. त्यावेळी चव्हाण यांचे मित्र शुभम सरोदे व अनिकेत गोडसे हे शरद भालेकर याला अडविण्यासाठी गेले असताना आरोपी योगेश भुजबळ व लक्ष्मण भालेकर यांनी लाकडी दांडक्याने सरोदे व गोडसे यांना मारहाण करीत मोटारीवर दगडफेक करीत मोटारीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChikhliचिखलीPoliceपोलिस