विनय कुमार चौबे यांनी स्वीकारली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे
By नारायण बडगुजर | Updated: December 14, 2022 18:14 IST2022-12-14T18:12:47+5:302022-12-14T18:14:29+5:30
बुधवारी सायंकाळी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला...

विनय कुमार चौबे यांनी स्वीकारली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे
पिंपरी : पिंपरी- चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त म्हणून अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (दि. १४) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबत मंगळवारी रात्री आदेश दिले होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्त अंकुश शिंदे यांनी 'दिशा' उपक्रम राबविला. तसेच बेसिक पोलिसिंगवर भर दिला. त्यात कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वतः लॉटरी सेंटरवर कारवाई केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले.
दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. चौबे यांनी बुधवारी सायंकाळी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.