VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: July 20, 2023 11:44 AM2023-07-20T11:44:45+5:302023-07-20T11:47:19+5:30

पहाटेच्यावेळी ही घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही...

VIDEO: Pipeline burst in Pimpri-Chinchwad; Police, Municipal Department at the spot | VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी

VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ता खचून पाईपलाईन फुटली; पोलीस, महापालिका विभाग घटनास्थळी

googlenewsNext

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे गुरुवारी (दि.२०) पहाटे कुणाल आयकॅान रोडवरील छत्रपती चौकातील, नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी भूस्खलन होत रस्ता खचला आहे. पहाटेच्यावेळी ही घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

या घटनेमुळे रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन, व स्ट्रीम वॉटर लाईन देखील तुटलेली आहे. पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी, व परिसरातील सोसायटी मधील नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तत्काळ महापालिका अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाला कळविले. 

त्यानुसार पोलीस व महापालिका विभाग घटनास्थळी पोहचले आहेत. घटनास्थळी बॅरीकेटीग केले असून महापालिका आपत्कालीन विभाग, पाणी पुरवठा विभागातर्फे पाईप लाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: VIDEO: Pipeline burst in Pimpri-Chinchwad; Police, Municipal Department at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.