Video - पिंपरीमध्ये इलेट्रीक दुचाकीला भीषण आग

By रोशन मोरे | Updated: November 18, 2023 17:59 IST2023-11-18T17:51:12+5:302023-11-18T17:59:41+5:30

बिजली नगर येथे अचानक आग लागून इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली.

Video Electric bike caught fire in Pimpri | Video - पिंपरीमध्ये इलेट्रीक दुचाकीला भीषण आग

Video - पिंपरीमध्ये इलेट्रीक दुचाकीला भीषण आग

पिंपरी : बिजली नगर येथे अचानक आग लागून इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमनच्या कर्मचा-यांनी होजरीलच्या साह्याने पेटलेल्या दुचाकीवर पाणी मारले. 

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गाडी मालक माधवी जाधव यांनी प्राधिकरण अग्निशमन येथे फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. तसेच एसओ गौतम इंगवले, वाहनचालक अमोल रांजणे, संपत गौंड, संजय महाडिक व सोमनाथ तुकदेव देवगडकर, दानवले या अग्नीशमनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Video Electric bike caught fire in Pimpri

टॅग्स :fireआग