व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 17:39 IST2019-03-24T17:38:18+5:302019-03-24T17:39:41+5:30
'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका
पिंपरी: 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पार्थ पवार यांनी धरला ठेका धरला.
श्री जगन्नाथ रथयात्रेला दत्तमंदिर यमुनानगर येथुन सुरुवात झाली. यावेळी राधा गोपीनाथ प्रभु, श्री भगवान प्रभु यांच्या उपस्थितीत रावेत श्री गोविंद धाम इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोपती दास, श्रीमान रोहिणीकुमार प्रभु, राधा प्रसाद दास, माजी उपमहापौर शैलजा मोरे, मोरेश्वर शेडगे, बिभिषण चौधरी, माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, दुर्गा मंदिराचे प्रमुख शैलेश कंद आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी श्री भगवान प्रभु यांच्या हस्ते जगन्नाथांची आरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांनी रथ ओढत रथयात्रेला सुरुवात केली. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी निगडी प्राधिकारणात हरे रामा हरे कृष्णा गाण्यावर ठेका धरला.