शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 17:00 IST

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; चोरटे अद्याप फरारच

ठळक मुद्देतळेगाव येथून दुचाकी चोरली

पिंपरी : शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची चोरी चोरट्यांकडून होत आहे. लाखो रुपयांच्या वाहनांची चोरी होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भगवान तोडकर (वय २३, रा. यमुनानगर, निगडी, मूळगाव मंगरुळ, ता. आष्टी, जि. बीड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी १० नोव्हेंबर रोजी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. वाहनचोरीचा दुसरा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी निखिल ज्ञानेथर फेगडे (वय २७, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १४) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. वाहचोरीचा तिसरा प्रकार पिंपरीतील मोरवाडी येथे घडला. याप्रकरणी अमित विजय भाटकर (वय ४२, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अहे. अमित यांचे मोरवाडी, पिंपरी येथे वाहनांचे वॉशिंग सेंटर आहे. त्यांचे ग्राहक रितेशकुमार युवराज सूर्यवंशी यांनी त्यांची साडेसात लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन अमित यांच्या वॉशिंग सेंटरमध्ये बुधवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास वॉशिंगसाठी दिली. त्यानंतर काही वेळेतच अज्ञात चोरट्यांनी अमित त्यांची नजर चुकवून कार चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.वाहनचोरीचा चौथा प्रकार नेरे, दत्तवाडी येथे घडला. याप्रकरणी शिवरंजन सत्यरंजन घठक (वय २३, रा. नेरे, दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवरंजन यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची ही दुचाकी बुधवारी (दि. १३) रात्री दहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत..........तळेगाव येथून दुचाकी चोरलीगुलाब व्यंकटी पवार (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. गुलाब यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी मंगळवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील परूळेकर हायस्कूलसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीThiefचोरtheftचोरीtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर