शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:01 IST

लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते.

पिंपरी : येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते. महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. परतीच्या पावसाकडून शेतकरी वर्गाला मोठी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यातील अनेक भागामध्ये परतीच्या पावसाने तोंडही दाखवले नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारामध्ये होणारी भाज्यांची आवक घटली आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे भाव कमी आहेत. टोमॅटो ८ ते ९ रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. वाटाण्याचे भाव १२० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मिरचीने पन्नाशी गाठली आहे. गवार, भेंडी, वांगी यांची प्रत्येकी ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. गुलटेकटी व मोशी येथील भाजी मंडईमध्ये आसपासच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होते. तेथून पिंपरीतील मंडईमध्ये भाज्यांची आवक होते. मात्र पाऊस पडला नसल्यामुळे आवक घटली आहे. त्याचा परिणाम भावावर होऊन भाज्यांचे भाव वाढले आहे. मेथी १५ ते २० रुपयाने विकली जात होती.फळबाजारांमध्ये फळांची आवक वाढली आहे. पेरू, पपई व सीताफळ यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली, तरी दिवाळीच्या इतर खरेदीमुळे ग्राहकांनी फळबाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाव मागील आठवड्यात जसे होते तसेच आहे. सीताफळ तीन प्रकारांत उपलब्ध असून ६०, ८० व १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. अंजीराचा हंगाम सुरू झाल्याने बाजारामध्ये अंजीर दाखल झाले आहे. १२० ते १८० रु. प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे.फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) पुढीलप्रमाणेबटाटे : २० ते २२, कांदे : २० ते २२, टोमॅटो : ०८ ते १०, गवार : ५० ते ६०, दोडका : ४०, घोसाळी : ४०, लसूण : ६०, आले : ४०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ५० ते ६०, कोबी : २०, फ्लॉवर : २५ ते ३०, शेवगा : ६० ते ७०, हिरवी मिरची : ५०, सिमला मिरची : २५ ते ३०, पडवळ : २०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : २०, काकडी : २०, चवळी : ३५ ते ४०, काळा घेवडा : ७० , तोंडली : ४०, गाजर : ३०, वाल : २५ ते ३०, राजमा : ४० ते ५०, मटार : १२० ते १३०, कारली : ४० ते ५०, पावटा : ५०, श्रावणी घेवडा : ४० ते ५० , लिंबू : ४० ते ५० (शेकडा)पालेभाज्यांचे भाव : कोथिंबीर : १० ते १५, मेथी : १५ ते २०, शेपू : १५ ते २०, पालक : ८ ते १० , मुळा : २० , कांदापात : १५, तांदुळजा : १०, पुदिना : ५.फळांचे भाव : सफरचंद : १००, पेरू : ६०, सीताफळ : ६०, ८०, १००, पपई : ५०, डाळिंब : १००, मोसंबी : ६०, संत्री : ८० ते १०० (परदेशी), किवी : १०० (४ नग), ड्रॅगन फ्रुट : ८० ते १००, पिअर : १६०, १८०(परदेशी).

टॅग्स :vegetableभाज्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड