शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप

By नारायण बडगुजर | Updated: September 22, 2022 16:31 IST

टीका न करता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे

पिंपरी : वायनरी, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना वेदांत प्रकल्पबाबत बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ व हरीत जलसमृद्ध गाव याविषयावरील कार्यशाळेच्या निमित्ताने महाजन आले होते. पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, ‘‘वेदांत आमच्या काळात नाही गेली. पाच जानेवारीला सरकारला पत्र दिले होते. सहा महिने काहीही केले नाही. बैठकही घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला टीकेचा अधिकार नाही. याबाबत महाविकास आघाडीने टीका न करता आत्मपरिक्षण करावे.’’

अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याचा परिणाम

महाजन म्हणाले, ‘‘अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी कोणाला वेळ दिला. घरातून बाहेर पडले नाहीत. मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. आमदार, खासदारांशी संवाद साधला नाही. उदासिनता हेती. केवळ प्रक्षोभक भाषणे केली. सहा महिने महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्याने हा प्रकल्प बाहेर गेला आहे.’’

शिवसेनेची शेवटची धडपड

महिनाभरात निवडणूक लागली तर कळेल, असे आव्हान भाजपाचे नेते अमित शहा यांना आव्हान देणारे उद्धव ठाकरे आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणी प्रमाणे वागत आहेत, अशी टिपन्नी करून महाजन म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील निकालात ठाकरे यांचा पक्ष शेवटी आहे. याबाबत आत्मपरिक्षण करावे. आपल्या कार्यकाळात ठाकरे यांनी  काहीही भरीव कामं केलं नाही. आता मात्र ते  शेवटची धडपड करतायत. आत्मपरिक्षण करून संयम ठेवावा. दसरा मेळाव्यालाही त्यांनी दुसरं मैदान बघाव लागतेय.  जलयुक्त शिवार योजनेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही उलट आम्हाला क्लीनंचिट  मिळाली आणि तुला योजनेचा गावांनाही फायदा झाला आहे.’’

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनPuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी