Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

By किरण शिंदे | Updated: May 25, 2025 13:17 IST2025-05-25T13:17:21+5:302025-05-25T13:17:53+5:30

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे

Vaishnavi Hagavane death case Pimpri Chinchwad police issues lookout notice for absconding Nilesh Chavan | Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे.
 
दरम्यान, वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र तिचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे संशयास्पद कारणं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या मृत्यूच्या प्रकरणात निलेश चव्हाणवर गंभीर आरोप असून, तो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईल लोकेशन, बँक खात्यांचे व्यवहार आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लुक आऊट नोटीस म्हणजे काय?

लुक आऊट नोटीस (LOC) म्हणजे एखादा संशयित व्यक्ती देशाबाहेर जाऊ नये म्हणून विमानतळ आणि बंदर अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देणे. निलेश चव्हाण देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.

Web Title: Vaishnavi Hagavane death case Pimpri Chinchwad police issues lookout notice for absconding Nilesh Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.