शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:39 IST

पिंपरी कॅम्पातील साई चौक येथे बेशिस्तरीत्या रस्त्यावर उभ्या केलेल्या २७ वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावत वाहचालकांकडून दंड वसूल केला. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी : पिंपरी कॅम्पातील साई चौक येथे बेशिस्तरीत्या रस्त्यावर उभ्या केलेल्या २७ वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावत वाहचालकांकडून दंड वसूल केला. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. शहरासह लगतच्या भागातील नागरिकदेखील येथे खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे कॅम्पातील शगुन चौक, साई चौक, कराची चौक या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, खरेदीसाठी येणारे अनेकजण आपली वाहने बेशिस्तरीत्या पार्किंगच्या पट्ट्याबाहेर उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बेशिस्त वाहनचालकांमुळे पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर शुक्रवारी वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. साई चौकात बेशिस्तरीत्या रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या २७ वाहनांना जॅमर लावण्यात आले. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला.
यासह या परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये येथील दुकानदारांकडूनही भर घातली जाते. दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य दुकानासमोरील पदपथासह थेट रस्त्यावरही मांडले जाते. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. अशा बेशिस्त दुकानदारांनाही पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या.