शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिगारी कामगाराच्या पाच लाखांच्या नोटा जळून खाक

By प्रकाश गायकर | Updated: January 23, 2025 20:45 IST

५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कामगारांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळून खाक

पिंपरी : पिंपळे गुरवमधील काशिद पार्क येथील बांधकाम मजुरांच्या झोपड्यांना गुरूवारी (दि. २३) सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच झोपड्या जळून खाक झाल्या. तर बांधकामा मजुरांचे पगार करण्यासाठी आणलेली ५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कामगारांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळून खाक झाले.पिंपळे गुरव येथील काशीद पार्क हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात बांधकाम मजुरांनी झोपड्या बांधून संसार थाटला आहे. येथील एका व्यक्तीकडे मजुरांचे पगार करण्यासाठी ठेकेदाराने ५ लाख ७० हजार रुपये दिले होते. ते पैसे लोखंडी पेटीमध्ये ठेवले होते. गुरूवारी सकाळी शॉर्ट सर्किट झाल्याने एका झोपडीमध्ये आग लागली. काही क्षणातच या आजूबाजूच्या झोपड्याही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मजुरांनी एक एक पैसा जमवून बनवलेले सोन्याचे दागिने त्यांनी डब्यामध्ये ठेवले होते. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की लोखंडी पेटी व डब्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले.तसेच या आगीत पाच झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यामध्ये मजुरांचा संसार, कपडालत्ता सर्वच जळाले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असे एकूण सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागातून तीन आणि रहाटणी उपविभागाचे सब ऑफिसर गौतम इंगवले यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.घटनास्थळी पोहोचण्यास अडथळाकाशीद पार्क हा अतिशय दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. दोन्ही बाजूला मोठ्या इमारती, अरुंद रस्ता आणि रस्त्यावर खासगी वाहनांची पार्किंग यामुळे अग्निशमन विभागाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा आला. खासगी वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रfireआगFire Brigadeअग्निशमन दलPuneपुणे