शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

संत तुकारामनगर येथील महापालिका मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 16:19 IST

पिंपरी शहरातील ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवर अनधिकृत आहेत..

ठळक मुद्देमोबाईल टॉवरची थकबाकी वसूल केली जाणार असून, थकबाकी न भरणारे टॉवर जप्त केले जाणार

पिंपरी: शहरातील ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची २२ कोटी ४३ लाखांचा मालमत्ता कर थकविला आहे. संत तुकारामनगर येथील महापालिका मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे, अशी माहितीही उघड झाली आहे.   माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांना मिळालेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. येथील नागरी वस्त्यांमध्ये वाढ होत असल्याने चांगली सेवा पुरवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी सध्या शहरांकडे मोर्चा वळवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी, मोठ्या इमारतींच्या गच्चीवर टोलेजंग मोबाईल टॉवर उभारले आहे.  मात्र, शहरातील विविध इमारतीवर उभारण्यात आलेल्या एकुण ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवरधारक मोबाईल कंपन्यांनी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. मोबाईल टॉवर उभारताना किरणोत्सर्ग स्तरही तपासावा लागतो. एका ठिकाणी किती टॉवर असावेत, निवासी इमारतीपासून ते किती दूर असावेत ?, त्याचेही निकष असतात; परंतु कुणीच हे निकष पाळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक अवैध इमारतींवरही अनधिकृत टॉवर असून, अशा प्रकारचे टॉवर अधिकृत होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.    काही मोठ्या हौसिंग सोसायट्यांनीही अनधिकृतपणे टॉवर उभारले आहेत. दोन वर्षांपूर्वी असे अनधिकृत टॉवर पिंपरी महापालिकेतर्फे सील केले होते. मात्र, मोबाईल कंपन्यांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती, असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. संत तुकारामनगर येथील महापालिका मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. त्याचीही १ लाख ७० हजार रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्ताधारकाचे नाव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि रिलायन्स इन्फो असल्याचे कागदपत्रात म्हटले आहे.   'या' आहेत, थकबाकीत अग्रेसर कंपन्या अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीमध्ये एअरटेलचे ६५ टॉवर, आयडियाचे ५६, रिलायन्सचे ५५, इंडसचे ४१, व्होडाफोनचे ३५, टाटाचे २४, तर बीएसएनएलचे १५ आदी मोठ-मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. याही कंपन्या थकबाकीत अग्रेसर आहेत.    ---------------------        अनधिकृत बांधकामावरील शास्तीकराबाबत सरकारने दिलेल्या सूचनांनुसार इतर बांधकामांप्रमाणेच अनधिकृत मोबाईल टॉवरलाही शास्तीकर लावला आहे. मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल केली जाणार असून, थकबाकी न भरणारे टॉवर जप्त केले जाणार आहेत.        -डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMobileमोबाइलshravan hardikarश्रावण हर्डिकर