शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उद्योगनगरी झाली भगवामय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:07 IST

छत्रपती शिवाजीमहाराज जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. दुचाकी रॅली, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आदींमुळे अवघी उद्योगनगरी भगवामय झाली होती

पिंपरी : छत्रपती शिवाजीमहाराज जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. दुचाकी रॅली, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आदींमुळे अवघी उद्योगनगरी भगवामय झाली होती. विविध शाळा, राजकीय, सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीतून लेझीम आदी नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनीही महाराजांना मानवंदना दिली.पी. के. इंटरनॅशनल स्कूलरहाटणी : पिंपळे सौदागर येथील हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.उद्योजक संजय भिसे आणि शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विकास काटे, नारायण काटे, बच्चूराम शर्मा, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, अनिता साने, पर्यवेक्षिका संगीता पराळे आदी या वेळी उपस्थित होते.चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज, राजमाता जिजाऊ, सईबाई, तसेच मावळ्यांची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. शाळेतील सर्वच विद्यार्थी, शिक्षक आदींनी भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे परिसर भगवामय झाला होता. विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी लेझीम व ताशाच्या गजरात नृत्य सादर करून छत्रपती शिवाजीमहाराजांना मानवंदना दिली. राहुल कोरे, सयाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.अभिनव विद्यालयात, जाधववाडीजाधववाडी : येथील अभिनव विद्यालयात शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे संस्थापक किरण मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.‘प्रतापगडावरील पराक्रम’ हे नाटक या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. मुख्याध्यापक परमेश्वर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गाणी, पोवाडे, भाषण यांनी शाळा परिसर दुमदुमला. शिक्षक विकास जगदाळे, त्रिंबक राऊत, रावसाहेब राख, अनिता गपाट, अविनाश गोंदकर, सचिन अनासे आदींनी कार्यक्रमांचे नियोजन केले.आरपीआय अल्पसंख्याक आघाडीपिंपरी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) अल्पसंख्याक आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी पिंपरीतील एच. ए. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष खाजाभाई शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शेख यांनी शिवाजीमहाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या वेळी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सालीम सय्यद, शहर सरचिटणीस शेखलाल नदाफ, शहर संघटक इक्बाल अन्सारी, हाजी नदाफ, मेहबूब बळगानु, मेहबूब नदाफ, नन्हे ताहीर शेख, तोफिक शेख उपस्थित होते.शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल विद्यालयपिंपरी : शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी विविध पोवाडे व स्तुतीगीते सादर केली. संस्थेचे अध्यक्ष अमृत पºहाड यांनी शिवरायांच्या जीवनावर व्याख्यान दिले. या वेळी विद्यार्थ्यांना वर्षभरातील विविध उपक्रम व स्पर्धाविषयींचे प्रशस्तिपत्रकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संचालक जनार्दन देशपांडे, सुखदा देशपांडे, रमेश कुलकर्णी, नलिनी कुलकर्णी, रमेश सराफ, विजया सराफ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रम देशमुख, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी गारगोटे उपस्थित होते. सुनील कांबळे, भाग्यश्री पाटील यांनी संयोजन केले. कविता हगवणे यांनी सूत्रसंचालन केले.श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयपिंपरी : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयात, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर व इंग्लिश मीडिअम स्कूल, काळेवाडी यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी झाली. संस्थेचे संचालक अ‍ॅड. सतीश घरत यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी संस्थेचे सचिव सागर तापकीर, संचालक नितीन पवार आणि शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक शशिकांत वाखारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.समाजवादी पार्टी, पुणे जिल्हापिंपरी : समाजवादी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हा युनिट यांच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त पिंपरीतील एच. ए. कॉलनी येथील महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराजांचा विजय असो, जय भवानी-जय शिवाजी अशी घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी समाजवादी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी, जावेद शहा, रवी यादव, रामरूप यादव, मतान कुरेशी, महिला शहराध्यक्ष मनोरमा काळे, उपस्थित होते.ज्ञानज्योती विद्यालयात शिवज्योतीचे स्वागतजाधववाडी : येथील ज्ञानज्योती विद्यालयात शिवजयंती साजरी झाली. विद्यार्थ्यांनी तुळापूर येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत केले. संस्थापक दिलीप राऊत यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला राऊत यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे, धनाजी उमाटे, सुभाष कावळे, हेमंत लामतुरे, बिभीषण खोसे, अभिजीत राऊत, पांडुरंग बोडके, राहुल राऊत, संदीप शिंदे, वैशाली चासकर, संगीता केदारी, जयश्री चक्कर, वैजयंती उमाटे, पल्लवी कुलकर्णी, उज्ज्वला जगदाळे, माधुरी बावनकर, कांचन काकडे, भारती मेळावणे, प्रिया निकम आदींनी संयोजन केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज