मोटार चालकाला लुटणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 19:34 IST2020-01-30T19:27:35+5:302020-01-30T19:34:51+5:30

''आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे, मोटारीच्या खाली ये...''

Two person arrested in case of theft | मोटार चालकाला लुटणारे दोघे जेरबंद

मोटार चालकाला लुटणारे दोघे जेरबंद

पिंपरी : मोटार चालकाला मारहाण करून चार जणांनी लुटले. हा प्रकार सोमवारी पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स चौकात हॉटेल नवमी समोर घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राकेश मनिराम यादव (वय २७, रा. मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  गणेश विक्रम गोरे, श्रीकांत गोविंद शिंदे (दोघे रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्यासह रजनीकांत गोविंद शिंदे, विराट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास फिर्यादी यादव हे थरमॅक्स चौकालगत हॉटेल नवमीजवळ त्यांची मोटार पार्कींगमधून बाहेर काढत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. 'आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे, मोटारीच्या खाली ये' असे आरोपी फिर्यादी यादव यांना म्हणाले. त्यानंतर आरोपींनी यादव यांना शिवीगाळ करून  मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील चांदीची चेन आणि रोकड असा पाच हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यादव यांनी तात्काळ पोलीसांना कळविले.

Web Title: Two person arrested in case of theft