Two men beaten for demanding cigarette money | सिगारेटचे पैसे मागितल्याने दोघांना मारहाण
सिगारेटचे पैसे मागितल्याने दोघांना मारहाण

पिंपरी : पानटपरीवर येऊन सिगारेट मागितली, मात्र सिगारटेचे पैसे न देताच आरोपी जावू लागले. त्यावेळी त्यांच्याकडे दुकानदारांने सिगारेटचे पैसे मागितले. याचा राग मनात धरून तिघाजणांनी दुकानदाराला जबर मराहाण केली. ही घटना शनिवारी (दि. ९) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. 

याप्रकरणी निजाम अशरफअली खान (वय २०, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, रोहित उर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे (वय १९), अजिंक्य उर्फ पवन शाम देशमुख (वय २१) व विकी राजु पठारे (वय १९, सर्व रा. काळेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निजाम खान यांची काळेवाडी येथे दोस्ती हॉटेल समोर पानटपरी आहे. शुक्रवारी सकाळी तेथे फिर्यादी निजाम व त्यांचा भाऊ रईस खान होते. त्यावेळी आरोपी तिथे सिगारेट घेण्यासाठी आले. त्यांनी सिगारेट घेतली मात्र पैसे न देताच ते जाऊ लागले. यावर निजाम यांनी त्यांच्याकडे सिगारेटचे पैसे मागितले. याचा राग येऊन आरोपींनी निजाम व रईस या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच एकाने निजाम यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तीनही आरोपींना अटक  केली असून वाकड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Two men beaten for demanding cigarette money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.