शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू चाकण शिक्रापूर मार्ग : मोहितेवाडी येथे घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 20:57 IST

मद्यपान करून संबंधित कंटेनर चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोहितेवाडी (ता. खेड गावच्या हद्दीत) भरधाव अवजड कंटेनरने समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला धडक दिली. अपघातात मिनी टेम्पो वाहनाचा चालक व एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर भरधाव कंटेनरने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन रस्त्यालगतच्या कंपनीचे कंपाउंड तोडून नुकसान केले.

चाकणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहितेवाडी हद्दीत बुधवारी (दि. २७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात वाहनचालक चेतन आहिरे (वय २७ रा. बुलढाणा) व त्यांच्या सोबत शेलपिंपळगाव येथून प्रवासासाठी बसलेले कपडे शिवणकाम व्यावसायिक गणेश मारुती पानसरे (वय ४२ रा. बहुळ ता. खेड) यांचा मृत्यू झाला आहे.  अवजड कंटेनर (एमएच ०४ केयु ५३०६) भरधाव वेगाने शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे जात होता.

दरम्यान,  मोहितेवाडी नजीक समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला (एमएच १२ एसएक्स १७२६) कंटेनरने समोरासमोर जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने समोरच्या वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर हे वाहन उडून अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन लगतच्या चारीत कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान मद्यपान करून संबंधित कंटेनर चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातChakanचाकणPoliceपोलिसArrestअटक