शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत चार अपघातात दोघांचा मृत्यू : दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 16:41 IST

शहरामध्ये विविध ठिकाणी चार अपघात झाले. यामध्ये दोघांजणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड येथे डंपरने ज्येष्ठ नागरिकांला धडक दिली.

पिंपरी : शहरामध्ये विविध ठिकाणी चार अपघात झाले. यामध्ये दोघांजणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड येथे डंपरने ज्येष्ठ नागरिकांला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता बिजलीनगर येथील श्रीपाद गुड इंग्रजी माध्यमिक शाळेसमोर घडली.               बजरंग जोरकर (वय ६५) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.  याप्रकरणी अर्चना विकास पवार (वय ३०) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डंपर चालक गणेश अत्तम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बजरंग जोरकर हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. दुसºया घटनेमध्ये दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबास जोरदार धडक बसून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना ९ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली. सचिन बबरूवान सुडे (वय २८, रा. लातूर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसनाईक संतोष हरिभाऊ रासकर (वय ४३) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सचिन हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच २४ एएल ४३१९) पुणे मुंबई रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यामध्ये सचिन याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलील तपास करीत आहेत. रस्त्याने जात असलेल्या नागरिकाला टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये नागरिकाच्या खांद्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास मार्शल कंपनीसमोर कासारवाडी येथे घडली. मोहनीश विश्वनाथ भाटीया असे जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी अनुराधा विश्वनाथ भाटीया (वय ५८, रा.रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनंत गोपीनाथ म्हस्के (वय २३, रा. शिवसाई कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ मोहनीश हे पुणे मुंबई रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने (एमएच १४ डीएम ३८३३) त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांच्या खांद्याला, छातीला व फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली.

 अ‍ॅटो रिक्षाने जात असताना मोटारीने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना २३ आॅगस्ट रोजी सात वाजता चिंचवड एमआयडीसी येथे घडली. याप्रकरणी रोझाना डडेसाईन  रॉड्रेक्स (वय ६५, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एमएच १४ एचएम ९०९९ या मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अ‍ॅटो रिक्षामधून आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या कपाळाला दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस