शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ई-मेल हॅक करून केला फ्रॉड ; फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांना मिळाले ५० लाख परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:47 IST

विदेशातील बँकांकडून मिळविली रक्कम

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची कामगिरी

पिंपरी : विदेशातील कंपनीकडून माल खरेदी करण्यासाठी ई-मेलद्वारे संपर्क साधला. मात्र हॅकरने विदेशी कंपनीचा ई-मेल हॅक करून बँक बदलली असून नवीन खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले. भारतीय कंपनीने त्यानुसार रक्कम अदा केली. मात्र संबंधित विदेशी कंपनीने पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. या फसवणूकप्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलने विदेशी बँकांकडे संपर्क साधला. ह्यपेमेंट गेटवेह्णद्वारे हा ह्यफ्रॉडह्ण झाल्याचे सिद्ध केले. त्यामुळे विदेशातील बँकांत गेलेले ५० लाख ७६ हजार ३३७ रुपये भारतातील फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांना परत मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टिंग एलएलपी आणि लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल, असे फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांची नावे आहेत. मधुसूदन अग्रवाल व सुनील मित्तल हे दोघे मित्तल प्रिसिजन या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीने एका चिनी कंपनीकडून एक उत्पादन खरेदी केले होते. त्याची रक्कम देण्यासाठी मित्तल यांनी चिनी कंपनीकडे त्यांचे बँक खात्याची माहिती ई-मेलद्वारे मागविली. त्यानुसार चिनी कंपनीने २१ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली. परंतु २४ आॅगस्ट रोजी एक ई-मेल आयडीवरून कळविण्यात आले की, सदरची चिनी कंपनी त्यांची बँक व खाते बदलत आहे. त्यानुसार युके येथील बँकेच्या खात्यात पैसे पाठविण्याचे ई-मेलद्वारे सांगण्यात आले. त्यानुसार मित्तल यांच्या कंपनीने ६२ हजार १० यूएस डॉलर भारतीय चलनानुसार ४४ लाख ७९ हजार ९१७ रुपये चिनी कंपनीच्या बदललेल्या बँक खात्यात जमा केले. तसेच त्याबाबत चिनी कंपनीला कळविण्यात आले. मात्र पैसे मिळाले नसल्याचे चिनी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे ई-मेल आयडीच्या दोन अक्षरात अदलाबदल करून फसवणूक करण्यात आल्याचे मित्तल यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. विदेशातील कंपनीचा ई-मेल हॅक झाल्याचे समोर आले. त्यानंतर युकेतील संबंधित बँकेकडे ई-मेलद्वारे संपर्क साधून सदरच्या खात्यातील व्यवहार थांबविण्याबाबत सांगण्यात आले. सदरचा व्यवहार पेमेंट गेटवेद्वारे झाल्याने संबंधित दुसºया बँकेलाही याबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर याबाबत सतत संपर्क साधून विदेशातील संबंधित बँकेकडून ४४ लाख ७९ हजार ९१७ रुपये मित्तल यांच्या कंपनीला परत मिळवून देण्यात आले.लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनी विदेशातील कंपनीकडून रॉ-मटेरियल घेते. लुमिनियस कंपनीला ई-मेल आला की, विदेशी कंपनीशी संबंधित दोन्ही ई-मेल आयडी बंद झाले असून, आपल्याला काही रॉ-मटेरियल लागत असल्यास आम्हाला नवीन आयडीवर ई-मेल करावा. त्यानुसार मटेरियलची मागणी केली असता पाच लाख ९७ हजार ३७६ रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मटेरियल मिळण्याबाबत संबंधित विदेशी कंपनीशी संपर्क साधण्यात आला. आम्हाला आपल्या कंपनीकडून पैसे मिळाले नाहीत. तसेच आमचा कोणताही ई-मेल आयडी बंद झाला नसल्याचे संबंधित विदेशी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर विदेशी बँकेशी संपर्क साधून सदरचा व्यवहार थांबविण्याबाबत सायबर सेलच्या पोलिसांकडून माहिती देण्यात आली. त्यानुसार न्यूयॉर्क येथील बँकेने पैसे परत केल्याने पाच लाख ९७ हजार ३७३ रुपये लुमिनियस कंपनीला मिळाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गरूड, पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, स्वाती लामखडे, पोलीस कर्मचारी मनोज राठोड, भास्कर भारती, अतुल लोखंडे, नीतेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, नाजुका हुलवळे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीbankबँक