शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन घरफोड्या, दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:17 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर शनिवारी (दि. १३) साडेअकरा ते रविवारी (दि. १४) दुपारी बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ लाख ३५ हजार ९५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली.

पिंपरी : शहरात लुटमारीसह घरफोडीचे दोन प्रकार घडले. घरफोड्यांच्या घटनांमध्ये चोरट्यांनी नऊ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तर दुचाकीस्वाराला मारहाण करून २३ हजार ७४० रुपये जबरदस्तीने घेत लुटमार केली. याप्रकरणी दिघी व निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १४) गुन्हे दाखल करण्यात आले.  

योगेश नामदेव दरेकर (वय ३०, रा. चऱ्होली, पुणे, मूळ रा. सुमननगर, लासलगाव, ता. निफाड, नाशिक) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर शनिवारी (दि. १३) साडेअकरा ते रविवारी (दि. १४) दुपारी बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ लाख ३५ हजार ९५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. तसेच फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे अभिजित सुरेश कांबळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी ८० हजार १०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी नऊ लाख १५ हजार १९५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.  

मारहाण करून दुचाकीस्वारास लुटलेमुकुंद अशोक भंडारी (वय २८, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धुनगाव, भाव्या बाविसकर (दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. शनिवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या बहिणीला भेटून परत हडपसर येथे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी ओटास्किम येथे चिकन चौकाजवळ आरोपींनी फिर्यादीला अडवून शिवीगाळ व दमदाटी करून पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे धुनगाव याने कोयत्याने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. अन्य आरोपींनीही शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी भाव्या याने दगडाने मारून फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने २३ हजार ७४० रुपये काढून घेतले

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेtheftचोरीpimpale saudagarपिंपळे सौदागर