शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली गाडी; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगून धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:02 IST

तुम्ही माझीच गाडी का अडवली, असे म्हणून मी आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावतो, मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी दिली.

ठळक मुद्देनिगडी येथील लोकमान्य टिळक चौकात वाहतूक नियमन करताना घडलेली घटना

पिंपरी : वाहतूक नियमन करताना चारचाकी वाहन अडविले म्हणून वाहतूक विभाग पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घातले. तसेच मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावतो मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन वाहनचालक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेला. निगडी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नामदेव चव्हाण (वय ४०, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय विष्णू जाधव (वय ५४) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी जाधव बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात वाहतूक नियमन करीत होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी चव्हाण त्याच्या चारचाकी वाहनातून जात असताना त्याला वाहन थांबविण्याचा इशारा केला.

मात्र चव्हाण याने पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच गाडीचा वेग कमी न करता जाधव यांना रस्त्याने फरपटत नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या कायदेशीर कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझीच गाडी का अडवली, असे म्हणून तुम्ही आमचेवर दादागिरी करताय, तुमची गुंडशाही चाललीय, मी आता लगेच आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावतो, मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन आरोपी चव्हाण हा फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या अंगावर धावून गेला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAccidentअपघात