शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्षगणना कधी संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 11:52 AM

२००५ ते २०१७ पर्यंत शहरातील वृक्षगणनाच करण्यात आली नव्हती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी ११ जानेवारी २०१८ मध्ये सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्याचे आदेश दिले होते

ठळक मुद्देमहापालिकेनकडून सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे. या कामास तब्बल ६ कोटी ८० लाख ५३ हजार ५५९ रुपये खर्च करण्यात आला

पिंपरी: महापालिका हद्दीत बेकायदेशीर वृक्षतोड वाढली आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन देखील व्यवस्थित होत नाही. मागील बारा वर्षात वृक्षांची संख्या भरमसाठ असल्याचा दावा उद्यान विभागाकडून केला जात आहे. तसेच सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यात आली आहे. मात्र, शहरांतील अवैध वृक्षतोड व होणारी वृक्षगणना यांची माहिती मिळत नसल्याचा रयत विद्यार्थी परिषदेने आरोप करत महापालिका भवनावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

२६ लाख झाडांची गणना पूर्ण२००५ ते २०१७ पर्यंत शहरातील वृक्षगणनाच करण्यात आली नव्हती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी ११ जानेवारी २०१८ मध्ये सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्याचे आदेश दिले होते. त्यावर निविदा राबवून सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यासाठी मे. टेराकॅन इकोटेक प्रा. लि. कंपनीला काम देण्यात आले होते. त्या कंपनीचे काम पूर्णत्वास आले असून आता फक्त देखरेख करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. त्यात वृक्षगणना होऊन शहरात २६ लाख ४१ हजार ९५० झाडांची गणना पूर्ण झाली आहे. कंपनीने डाटा तयार करून महापालिकेकडे सूपूर्द केला आहे. काही बंगल्याच्या मालकांनी व कंपन्यांनी परवानग्या दिल्या नाहीत. त्या ठिकाणांची गणना बाकी आहे. परवानगी न मिळालेल्या जवळपास २००-३०० ठिकाणं असल्याचं कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.

६ कोटींची निविदा, ५ लाखांचा दंडमहापालिकेकडून सॅटेलाईट इमेजद्वारे वृक्षगणना करण्यात येत आहे. संबंधित कंपनीला दोन वर्षांसाठी वृक्षगणना व ५ वर्षे देखभा‌लीची मुदत देण्यात आली. या कामास तब्बल ६ कोटी ८० लाख ५३ हजार ५५९ रुपये खर्च करण्यात आला. यापैकी सॉफ्टवेअर, यंत्रसामग्री खरेदीसाठी कंपनीला दोन कोटी रुपये अदा केले होते. वृक्षगणना वेळेत पूर्ण न केल्याबद्दल कंपनीला २ लाख ७४ हजार व २ लाख ३४ हजार असा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख ३४ हजारांचा दंड कंपनीने पालिकेस भरला असून २ लाख ७४ हजार रुपये अदा होणा-या रक्कमेतून वजा केले जाणार आहेत.

वृक्षगणनेचे काम अंतिम टप्प्यात-

महापालिकेच्या सर्व प्रभागातील वृक्षगणना पुर्ण झालीय, सध्यस्थितीत जिथे परवारनगी मिळाली नाही त्या प्रभागात काम सुरु आहे. आज अखेर २६ लाख झाडांची मोजणी केली आहे. या वृक्षगणनेमुळे झाडाचा प्रकार, त्याचे नेमके ठिकाण, आकार, उंची आदी माहिती संकलित झाली आहे.-सतीश इंगळे, उपायुक्त, वृक्ष व उद्यान विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकावृक्षगणना पूर्णत्वास येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोठेही नोंद झाल्याचे आणखीही दिसत नाही. कंपनीने प्रत्यक्षात किती काम केले आहे. कंपनीने कामात निष्काळजीपणा केला आहे. संबंधित कंपनी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

- रविराज काळे, रयत विद्यार्थी परिषद

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे