पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 13:27 IST2020-09-30T13:19:20+5:302020-09-30T13:27:32+5:30
आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत कृष्ण प्रकाश यांनी अशाप्रकारे प्रस्थापितांना झटका दिला आहे..

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या
पिंपरी : शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिन्या भरातच आयुक्तालयांतर्गत ३९९ पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहायक फौजदारांचा त्यात समावेश आहे. वाहतूक शाखा, मुख्यालय ते विविध पोलीस ठाणे तसेच तपासी पथकातील पोलिसांच्या या बदल्या सोमवारी (दि. २८ ) उशिरा झाल्या.
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांचा काही भाग एकत्र करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालय कार्यान्वित झाले. आयुक्तालय नवीन असल्याने अनेक पोलिसांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. तर काही जणांनी आहे तेथेच ठाण मांडले. यात काही पोलीस प्रस्थापित असल्यासारखे होते. कृष्ण प्रकाश यांनी ५ सप्टेंबर रोजी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत अशा प्रस्थापितांना झटका दिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बदल्या झालेल्यांमध्ये सहायक फौजदार १३ , पोलीस हवालदार १२२, पोलीस नाईक १५७, पोलीस शिपाई १०७ यांचा समावेश आहे.
बदली झालेले सहायक फौजदार
शिरीष कोंडाजी रसार (भोसरी ते पिंपरी पोलीस ठाणे), हनुमंत बबन आवटे (चिंचवड ते विशेष शाखा), अशोक ज्ञानेश्वर जाधव (पिंपरी ते नियंत्रण कक्ष), बाबासाहेब दादासाहेब केदार (भोसरी एमआयडीसी येथे सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), राजेंद्र बाबासाहेब पवार (भोसरी एमआयडीसी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), विष्णू शंकर माळी (भोसरी एमआयडीसी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), संजय नारायण भालेराव (सांगवी - सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), प्रकाश निवृत्ती नलगे (सांगवी – वाकड पोलीस ठाणे), नथुराम बबनराव शेवाळे (देहूरोड – सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ), मनोज पांडुरंग बनसोडे (वाकड ते रावेत पोलीस चौकी), उत्तम नामदेव सांडभोर (वाहतूक शाखा ते निगडी पोलीस ठाणे), शाकीर गौसमोहद्दीन जिनेडी (मुख्यालय ते गुन्हे शाखा), चंद्रकांत सुलाभराव काटे (दिघी ते पिंपरी-चिंचवड अतिक्रमण निर्मूलन विभाग).