शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतुक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 17:39 IST

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या.

ठळक मुद्दे मुंबईकडे जाणारी सर्व वाहने ही लोणावळा एक्झिटजवळून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली क्रेनला पाचारण करत कंटेनर बाजुला काढण्याचे काम सुरु

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा बाह्य वळणाजवळील उतारावर भरधाव वेगातील कंटेनर उलटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. सोमवारी (दि.२४)साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईकडे जाणारी सर्व वाहने ही लोणावळा एक्झिटजवळून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात आली आहे. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने लोणावळा व खंडाळा शहरात देखिल वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.     पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर (एमएच-४६. एफवाय. ५३३०) हा खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या. सदर घटना घडली त्याठिकाणी बंदोबस्त करता पोलीस असल्याने तातडीने क्रेनला पाचारण करत कंटेनर बाजुला काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान एक्सप्रेस वेवरील सर्व वाहतुक ही वलवण येथील लोणावळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली असल्याची माहिती महामार्गाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिली.

टॅग्स :lonavalaलोणावळाhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात