शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा, रुग्ण, विद्यार्थ्यांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:40 IST

पिंपरी शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

पिंपरी : शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. वाहनांची गर्दी वाढल्यामुळे चालकांमध्ये वादविवाद होतात.मेट्रोच्या कामाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आहे. रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहनांची गर्दी होत आहे. बीआरटी मार्गामुळे मुख्य रस्ता अजूनच अरुंद झाला आहे. दापोडी ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या दरम्यानच्या प्रत्येक चौकात वाहतूककोंडी होते. पिंपरी येथील मोरवाडी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सिग्नलच्या दोन्ही बाजूने रस्ता अरुंद झाला आहे. येथून एकाच लेनमध्ये वाहने चालतात. त्यातच भर म्हणून चौकामध्ये रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षा उभ्या असल्यामुळे वाहनांना पुढे जाता येत नाही. परिणामी सिग्नलच्या मागील बाजूपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सिग्नल सुरू झाल्याने विरुध्द बाजूने येणारे वाहनचालक भरधाव वाहने घेऊन येतात. त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात.रस्त्यावरील वादाचा व सततच्या वाहतूककोंडीचा फटका रुग्णांना बसत आहे. तातडीने रुग्णालयात रुग्णांना दाखल करताना रुग्णवाहिकेच्या चालकांची दमछाक होते. रस्ता अरुंद असल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक स्कुलबस या कोंडीमध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात. उशीर झाल्यास काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संबंधित दिवशी प्रवेद दिला जात नाही. त्यामुळे उशीर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना घरी परतावे लागते. अनेक कामगारांना कार्यालय व कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे बहुतांश कामगारांना ‘लेट मार्क’चा शेरा पडतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMetroमेट्रो