छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्याला अटक
By प्रकाश गायकर | Updated: February 2, 2024 18:54 IST2024-02-02T18:53:33+5:302024-02-02T18:54:29+5:30
सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली...

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्याला अटक
पिंपरी : घर खरेदीसाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. १) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी खंडू उत्तम जाधव (वय ४९, रा. थेरगाव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिला आहे. त्यानुसार, सासू, नणंद, सासरे परशुराम दिनकरा माने व पती किरण परशुराम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती व सासु-सासऱ्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हिला तिचे सासू सासरे, नवरा, नणंद हे माहेरहून नवीन फ्लॅटसाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत शारिरीक व मानसिक छळ करत होते. तसेच पती देखील चारित्र्यावरून संशय घेवून तिला हिनवून वागवत होता. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.