शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यक्रम हवा -मनोहर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 2:42 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम केले आहे. ललित शाखेचा समन्वयक, विविध चौकशी समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मॉरिशसमध्ये मराठी विषयाच्या पदव्युत्तर संशोधन विभागाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विद्यापीठ अध्यापक गटातून मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव नुकतेच निवडून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विभागप्रमुखांचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वी अधिसभेवर काम केले आहे. ललित शाखेचा समन्वयक, विविध चौकशी समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मॉरिशसमध्ये मराठी विषयाच्या पदव्युत्तर संशोधन विभागाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.मनोहर जाधव म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ५-५ वर्षे वाट पाहावी लागत आहे. त्यांच्याकडून सगळ्या पात्रता पूर्ण करण्यात आल्यानंतरही पदोन्नती मिळविण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे हा मुद्दा प्राध्यापकांसाठी प्राधान्याचा, संवेदनशील आणि कळीचा बनला आहे.या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी राबविली जाणारी करिअर अ‍ॅडव्हॉन्स स्किमची (कॅस) प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी अध्यापक गटातून सिनेटवर निवडून आलेले आम्ही सदस्य प्रयत्नशील राहणार आहोत. विभागप्रमुख, प्राध्यापकांमध्ये संवाद नसणे, प्रशासकीय अडचणी आदी विविध कारणांमुळे ही पदोन्नतीची प्रक्रिया रखडत असल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठ प्रशासनाने त्यामध्ये येणाºया अडचणी दूर करून कालबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे. विद्यापीठामध्ये काही प्राध्यापकांची नियुक्ती विशिष्ट मुदतीसाठी केली जाते. त्यांची मुदत संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्या जागेवर शिकविण्यासाठी दुसºया व्यक्तीची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे प्रशासनाने यासंबंधी दीर्घकालीन धोरण ठरविले पाहिजे. त्यासाठी अधिसभेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.शिक्षकांच्या समूह विम्याची आर्थिक सीमा ७ लाखांपर्यंत वाढविली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.आरोग्य केंद्रात ५ बेडची व्यवस्था व्हावी, छोटे आॅपरेशन थिएटर असावे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक यांना याचा चांगला फायदा होऊ शकेल.संशोधनासाठी विद्यापीठ, यूजीसीकडून विविध योजनेतून फंड उपलब्ध करून दिले जातात. संशोधनाचा दर्जा वाढण्यासाठी त्या-त्या विद्याशाखेमध्ये कार्यशाळा घेतल्या जाव्यात. मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना बोलावले जावे. समाजोपयोगी संशोधन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जावे. विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या विभागात प्रवेश घेतल्यानंतर त्याला हवे असल्यास लगेच वसतिगृह उपलब्ध होणे आवश्यक आहे. भाषा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चर्चासत्रांचे आयोजन केले पाहिजे. मराठी विभागाने मराठी विषयाचे व्यावसायिक अंगाने शिक्षण देण्यासाठी विविध पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात बदल होणे आवश्यक आहे. कौशल्य अभ्यासक्रमाची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. त्याचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होणे आवश्यक आहे.बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्राची उभारणी होणे आवश्यक आहे.विद्यार्थी नाइलाजाने बहि:स्थ शिक्षण घेत असतो. तो कुठेतरी नोकरीला असतो. तरीही शिक्षण घेण्याची उमेद त्याच्यामध्ये असते. बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठाने अभ्यास केंद्राची उभारणी करावी. या अभ्यास केंद्रातून त्यांना तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. अधिसभेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणार आहोत.विभागप्रमुखांचा प्रतिनिधी म्हणून तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी माझी सिनेटवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर पुन्हा अध्यापक गटातून प्राध्यापकांचे सिनेटवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विद्यापीठाच्या विविध चौकशी समित्यांवर यापूर्वी अध्यक्ष, सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या अनुभवाचा उपयोग सिनेट सदस्य म्हणून काम करताना निश्चितच होईल. विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या माध्यमातून पाठपुरावा करता येईल.

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरीPuneपुणे