शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पड पड रे पावसा; तहानला जीव आता

By admin | Updated: July 5, 2015 00:33 IST

अकरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळ कोरडेठाक पडले आहे. अशातच हवामान खात्याकडूनही पावसाची कोणतीच शक्यता वर्तविली जात नाही. ऐन भरातच पाऊस पळाल्याने

पिंपरी : अकरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळ कोरडेठाक पडले आहे. अशातच हवामान खात्याकडूनही पावसाची कोणतीच शक्यता वर्तविली जात नाही. ऐन भरातच पाऊस पळाल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.जूनच्या मध्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसला होता. त्यामुळे शहरवासीयांसह सर्वांनाच उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळाला. आता मॉन्सूनच्या आगमनामुळे सुखावह दिवस येतील, असे आशादायक चित्र निर्माण झाले होते. दमदार पावसामुळे सर्वत्रच पुरेसा ओलावा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी उरकून घेतली. सुरुवातीच्या पेरणीच्या पिकांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली आहे. यामुळे आता पिके जोमदार येतील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. मात्र, कोठे तरी माशी शिंकली अन् निसर्गाने नाराजी दाखविली. पावसाने अनपेक्षितपणे पाठ फिरविली आहे. मॉन्सूनचा प्रवास अर्ध्यावरच खंडित झाला. २४ जूनला शेवटचा पाऊस झाला आहे. त्यानंतर कोणत्याच भागात पाऊस पडला नाही. आता कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे येथील हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आठवडाभरातच पावसाळी वातावरण उलटे फिरले असून, आभाळ पुन्हा रखरखीत होऊ लागले आाहे. तापमान ३१ अंशांपर्यंत वाढलेजुलै महिना पावसासाठीच ओळखला जातो. या काळात संततधार बरसणारा पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वातावरणात पसरणाऱ्या गारठ्याचा प्रत्यय येतो. मात्र, या वर्षी पाऊस लांबल्याने वातावरणात उष्णता वाढू लागल्याचा विचित्र अनुभव येऊ लागला आहे. परिसरातील कमाल तापमान मागील दहा दिवसांतच २८ अंश सेल्सिअसवरून ३१ अंशांवर पोहोचले आहे. मोकळे आभाळ व वाढलेल्या तापमानाचा विचित्र अनुभव सध्या येत आहे. (प्रतिनिधी)