चारचाकी वाहनांच्या काचा फोडून रोकडसह तीन लॅपटॉप, कागदपत्रे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:50 IST2021-08-10T17:44:06+5:302021-08-10T17:50:07+5:30
अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या दोन चारचाकी वाहनांच्या डाव्या बाजूच्या मागील काचा फोडून नुकसान केले.

चारचाकी वाहनांच्या काचा फोडून रोकडसह तीन लॅपटॉप, कागदपत्रे लंपास
पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून एक लाख ९० हजारांची रोकड, तीन लॅपटॉप, बॅगा व त्यातील वस्तू तसेच कागदपत्रे चोरून नेले. पिनॅकल सोसायटीसमोर सार्वजनिक रस्त्यावर बावधन येथे सोमवारी (दि. ९) सायंकाळी सव्वापाच ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.
प्रदीप एकनाथ कांबळे (वय ३३, रा. निंबाळकर नगर, कोल्हापूर) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या दोन चारचाकी वाहनांच्या डाव्या बाजूच्या मागील काचा फोडून नुकसान केले. तसेच एक लाख ९० हजाराची रोकड, तीन लॅपटॉप व त्यातील वस्तू तसेच कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.