शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad: पिंपरीत चोरांचा सुळसुळाट; दुकान फोडून ५२ मोबाईलसह ३ लाखांचे साहित्य चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:27 IST

दुकानाचे शटर उचकटून ५२ मोबाईल फोन तसेच ब्लूटूथ संच, पावर बॅंक, स्मार्ट वॉच, कॅमेरे, असे तीन लाख १४ हजार ६६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून ५२ मोबाईल फोन तसेच ब्लूटूथ संच, पावर बॅंक, स्मार्ट वॉच, कॅमेरे, असे तीन लाख १४ हजार ६६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. रुपीनगर, तळवडे येथे सोमवारी (दि. १४) रात्री साडेनऊ ते मंगळवारी (दि. १५) सकाळी सहा या कालावधीत हा प्रकार घडला. हनुमंत कल्याण ढेरे (वय ३२, रा. श्रीराम कॉलनी, रुपीनगर, तळवडे) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे रुपीनगर येथे सक्षम एंटरप्राइजेस या नावाचे दुकान आहे. फिर्यादीने ते दुकान रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून विविध कंपन्यांचे ५२ मोबाईल फोन, दोन टॅब, स्मार्ट वॉच, एअर बड्स, ब्ल्यूटूथ संच, दोन कॅमेरे, २० पावर बॅंक, असा एकूण तीन लाख १४ हजार ६६९ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल