शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अपघातांत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 17, 2015 02:42 IST

निगडी, दिघी, हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. चिखलीजवळील हरगुडे वस्ती येथील शिवशंभो चौकात

पिंपरी : निगडी, दिघी, हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. चिखलीजवळील हरगुडे वस्ती येथील शिवशंभो चौकात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात शहाजी अनंतराव पवार (वय ७०, रा. शाहूनगर, चिंचवड) या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष मधुकर गायकवाड (वय ३०, रा. मोरेवस्ती, चिखली) या मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजी पवार पायी जात असताना गायकवाड यांच्या भरधाव वेगातील मोटारीची त्यांना धडक बसली. यामध्ये पवार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रस्ता ओलांडत असताना मोटारीची धडक बसल्याने दिलीपसिंह नंदसिंह (वय ३७, रा. लोधीरोड, दिल्ली) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारचालक जगदीश राजाराम पाटील (रा. कोथरूड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी - शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाकडहून कोथरूडकडे जाताना पाषाण तलावाजवळील रस्ता नंदसिंह ओलांडत होते. दरम्यान, पाटील याच्याकडील भरधाव वेगातील मोटारीची नंदसिंह यांना धडक बसली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. डुडुळगाव जकात नाक्याजवळ झालेल्या अपघातात रामू सुग्गन दिवाकर (वय ३५, रा. देहूफाटा, आळंदी) या सायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ८ आॅगस्टला सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. दिवाकर हे पेरू आणण्यासाठी सायकलवरून आळंदीकडून मोशीकडे जात असताना भरधाव मोटारीची त्यांना धडक बसली. यामध्ये दिवाकर जखमी झाले. (प्रतिनिधी)