Threats to death by sending obscene messages from a tik tok app | टिकटॉकवरून अश्लील मेसेज पाठवून जिवे मारण्याची धमकी

टिकटॉकवरून अश्लील मेसेज पाठवून जिवे मारण्याची धमकी

ठळक मुद्दे तरुणीसह तिघींची काढली छेड पाच जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : टिकटॉकवरून अश्लिल मेसेज करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीचे अश्लील नावाने अकाऊंट तयार करून त्यावर तिचा व्हिडीओ एडीट करून अश्लील गाणे एडिंटिंग करून टिकटॉकवर अपलोड केले. १ जुलै २०१९ पासून हा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 21) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अक्षय साहेबराव म्हसे (रा. जुनी सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली), सत्यवान झांजे (रा. कात्रज, पुणे), रोहन कणसे, सुरज जाधव (रा. रहाटणी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी टिकटॉक ॲपवर अपलोड केलेल्या व्हिडीओवर आरोपी अक्षय म्हसे याने अश्लील कमेंट केली. फिर्यादी महिलेच्या व्हॉटसअप नंबरवर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच इतर आरोपींना फिर्यादी महिलेचा मोबाइल नंबर देऊन अश्लील मेसेज करून धमकी देण्यास सांगितले.

सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील २० वर्षीय तरुणीचे आरोपी अक्षय म्हसे याने अश्लील नावाने अकाऊंट तयार केले. तरुणीने टिकटॉकवर अपलोड केलेला तिचा व्हिडीओ एडिट करून अश्लील गाणे एडिटिंग करून टिकटॉकवर अपलोड करून व्हायरल केले.  वाकड येथील २९ वर्षीय महिलेले आरोपी अक्षय म्हसे याच्या व्हिडीओला कमेंट केली होती. तुझा पत्ता सापडला आहे, माझी पूर्ण टीम लवकरच तुझ्या घरी येणार आहे, असे कमेंट आरोपी अक्षय म्हसे याने केले. तसेच आरोपी गोविंद पाटील याने टिकटॉकवरून या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Threats to death by sending obscene messages from a tik tok app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.