देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:13 IST2018-09-29T18:09:55+5:302018-09-29T18:13:19+5:30
किवळे येथे तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

देहूरोड येथे पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला धमकाविले
पिंपरी : तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी किवळे येथील न्यु साई लॉज येथे घडली. अमित गजानन वानारे, आशिष किसन भटकर (दोघेही रा. किवळे, ता. हवेली. जि. पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी करण प्रकाश नायर (वय ३२, रा. दत्तवाडी, मारुंजी, ता. हवेली, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर हे यु साई लॉज येथे काम करत असताना आरोपी त्याठिकाणी आले. नायर यांना धमकावत, शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. तसेच दहा हजार रुपयांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींना अटक करुन पोलिसांनी पिस्तुलही जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक मनोज पवार करत आहेत.