Pune: लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो उमेदवार; मराठा क्रांती मोर्चाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:45 PM2024-03-11T12:45:27+5:302024-03-11T12:45:55+5:30

सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. या निषेधार्थ पिंपरी- चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला...

Thousands of candidates will contest the Lok Sabha against the rulers; Resolution of Maratha Kranti Morcha | Pune: लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो उमेदवार; मराठा क्रांती मोर्चाचा ठराव

Pune: लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो उमेदवार; मराठा क्रांती मोर्चाचा ठराव

पिंपरी :मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक भोईर व्यायामशाळा, चिंचवडगाव येथे रविवारी झाली. लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने ‘सगेसोयरे’बाबतची अधिसूचना काढून आंदोलन स्थगित करायला लावले. अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागवल्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झाले. मात्र, अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर केले नाही.

ठराव मंजूर

सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. या निषेधार्थ पिंपरी- चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी मारुती भापकर, मनोहर वाडेकर, प्रकाश जाधव, सतीश काळे, जीवन बोराडे, धनाजी येळकर, नकुल भोईर, वैभव जाधव, वसंत पाटील, संजय जाधव, अभिषेक म्हसे, सचिन पवार, शिवाजी पाडुळे, गणेश देवराम, ब्रह्मानंद जाधव, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सतीश शेलार, संदीप नवसुपे, ओंकार देशमुख, मोहन पवार, राज साळुंखे, स्वप्नील परांडे आदी उपस्थित होते.

मंत्र्यांनाही घेराव घालणार!

कायद्याची अंमलबजावणी न केल्यास मोदी यांच्याविरोधात एक हजार उमेदवार उभे करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आजवर गप्प बसलेल्या पंतप्रधानांचे लक्ष वेधणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात व पुणे जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Thousands of candidates will contest the Lok Sabha against the rulers; Resolution of Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.