Thieves' stash on cash placed in the tempo | टेम्पोमध्ये ठेवलेल्या रोख रक्कमेवर चोरांचा डल्ला
टेम्पोमध्ये ठेवलेल्या रोख रक्कमेवर चोरांचा डल्ला

पिंपरी : सकाळच्या वेळी टेम्पोमध्ये पेपरचे गठ्ठे भरत असताना अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या उघड्या काचेवाटे हात घालून ९० हजार रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान चिंचवड स्टेशन येथे घडली. याप्रकरणी बाळु मारूती थोपडे (वय ३२, रा. सिंहगड रोड, धायरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळु थोपडे हे सकाळी चिंचवड स्टेशन येथील द्वारकादास साडी दुकानाजवळ टेम्पोमध्ये पेपरचे गठ्ठे भरत होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा टेम्पो (एमएच १२ ईक्यु ७०१९) लॉक केला नव्हता. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने टेम्पोच्या उघड्या दरवाज्याच्या काचेवाटे आतमध्ये हात घातला. टेम्पोतील चालकाच्या शीटजवळ ठेवेलेले ९० हजार रोख, ५ गॅ्रम वजनाची अंगठी व कागदपत्रे असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Thieves' stash on cash placed in the tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.