शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

खासगी बसमधून सोने चोरणाऱ्यांना मध्यप्रदेशामधून केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:31 IST

चोरट्यांनी बॅगमधील एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिरे व रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली.

पिंपरी : खासगी बसमधून एक कोटीचे सोने, हिऱ्यांचे दागिने, रोकड चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात पकडले. त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीची ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, ११ लाख रुपये किमतीची मोटार असा ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुस्ताक समशेर खान (वय ३१), राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय ३८) आणि इस्माईल बाबू खान (वय ३३, तिघे रा. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय २४, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) हे भवानी एअर लॉजेस्टीक या कुरीयर कंपनीचे सोने, हिऱ्यांचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैदराबाद येथून मुंबई येथे खासगी प्रवासी लक्झरी बसने घेऊन जात होते. बस सकाळी चहा व नाष्टा करण्यासाठी देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर पुनावळे येथील हॉटेल न्यू सागर येथे थांबली. त्या वेळी दीपक सैनी हा फ्रेश होण्यासाठी गाडीतून उतरला. त्याने त्याची सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिरे व रोख रक्कम असलेली बॅग आसनाखाली ठेवली. चोरट्यांनी बॅगमधील एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, हिरे व रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. सैनी यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटवली. 

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग पथकाने पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना गुन्हेगाराची ओळख पटली. चोरटे मध्यप्रदेशातील इटावा, देवास येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या संयुक्त तपास पथकाने इटावा शहर गाठले. सलग आठ दिवस सापळा रचून, वेशांंतर करुन मुस्ताक खान याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांचे ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि ११ लाख रुपये किमतीची मोटार असा ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी