पिंपरी : वाकड परिसरात महागड्या किमतीचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. गेलेले मोबाईल परत मिळण्याची फार कमी शक्यता असते. पण शेवटी मोबाईल हरवल्याने महत्वाचे संपर्क जाणे, तसेच वाया गेलेले पैसे याची हळहळ कितीही नाही म्हटले तरी असतेच ना..स्वत:ची समजूत काढत प्रत्येकजण या दु:खातून सावरतो..आशा सोडून देण्यापलीकडे दुसरा पर्याय तरी काय असतो.. या अवस्थेत व्हॅलेनटाईन डे दिवशी पोलीस ठाण्यातून तुमचा हरवलेला मोबाईल सापडला आहे अशी वाक्य कानावर पडली तर निश्चितच आनंदाला उधाण येणार हे नक्की.. वाकडपोलिसांनी तब्बल २०१ जणांच्या चेहऱ्यावर असा सुखद धक्का देत त्यांचा व्हॅलेनटाईन डे स्पेशल केला. ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने व त्यांच्या पथकाने मोबाइलचे कटएक नंबर ट्रेसिंगला लावून २०१ महागड्या मोबाइलचा शोध लावला. हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. गुरुवारी मोबाइलचे वाटप मूळ मालकांना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजन, उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी डी.डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
‘त्यांनी’ सोडून दिली आशा...पण पोलिसांनी त्या ‘२०१’ जणांचा व्हॅलेनटाईन डे केला स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 18:58 IST
मोबाईल हरवल्याने महत्वाचे संपर्क जाणे, तसेच वाया गेलेले पैसे याची हळहळ कितीही नाही म्हटले तरी असतेच ना..
‘त्यांनी’ सोडून दिली आशा...पण पोलिसांनी त्या ‘२०१’ जणांचा व्हॅलेनटाईन डे केला स्पेशल
ठळक मुद्देगुरुवारी मोबाइलचे मूळ मालकांना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते वाटप