शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी, कान्होबा पाठोपाठ भैरवनाथ मंदिरात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 14:00 IST

सांगवी-पिंपळे गुरव येथील तुळजाभवनी मंदिरात अज्ञात चोरट्याने १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चाेरला.

पिंपरी : सांगवी-पिंपळे गुरव येथील तुळजाभवनी मंदिरात अज्ञात चोरट्याने १२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चाेरला. तर याच परिसरातील स्मशानभूमीजवळ असलेल्या कान्होबा मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजारांचा ऐवज लांबविला. शुक्रवारी रात्री दोन मंदिरांत चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना ताज्या असताना अज्ञात चोरट्यांनी याच परिसरातील भैरवनाथ मंदिराच्या दानपेटीवरसुद्धा डल्ला मारला. तेथून १२०० रुपयांचा ऐवज पळविला आहे. सांगवी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल श्रीकांत कदम यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तुळजाभवानी मंदिरात शुक्रवारी झालेल्या चोरीप्रकरणी अक्षय अनिल साळवे (वय २३) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. आरोपीने पितळी दिवा, समई, दहा हजार रुपये किमतीचा एलईडी दूरचित्रवाणी संच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. त्याच दिवशी  दुसरी घटना या परिसरातील कान्होबा मंदिरात घडली. सूर्यकांत ज्ञानोबा देवकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. तांब्या पितळेची भांडी, मूर्ती, दानपेटीतील रोकड तसेच पूजेचे साहित्य असा सुमारे १९ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची पोलिसांकडे नोंद आहे. या दोन घटना ताज्या असताना, याच परिसरातील भैरवनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. दानपेटीतील १२०० रुपयाची रोकडे पळवुन नेल्याची बाब उघडकीस आली आहे. एकाच परिसरात दोन दिवसात मंदिरातील चोरीच्या तीन घटना घडल्या असून सांगवी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीTempleमंदिरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी