शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 21:36 IST

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

पिंपरी : शहरात चोरटे सुसाट आहेत. भरदिवसा वाहने चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. चोरट्यांनी शहरातून सहा वाहने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

अशोक रंगनाथ भोसले (वय ३३, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी चाकण येथील श्रध्दा हॉस्पिटल समोरील पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. २१) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली. 

सखाराम रावसाहेब कांबळे (वय ३४, रा. बालाजीनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत बालाजीनगर येथे पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चाेरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. २१) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. २२) सकाळी आठच्या दरम्यान घडला. 

रवींद्र शिवाजी शेळके (वय २३, रा. ताम्हाणे वस्ती) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किमतीची राहत्या घराच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. १९) रात्री आठ ते रविवारी सकाळी आठच्या दरम्यान घडला. सिद्धाराम रेवप्पा शिवशरण (वय ३७, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार १४ जून रोजी रात्री साडेदहा ते १५ जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली. 

कार्तिक नंदू स्वामी (वय १९, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी कोकणे चौक, रहाटणी येथे पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार रविवारी (दि. २०) रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान घडला.   

चारचाकी वाहनाचा सायलेन्सर चोरी

चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या २० हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला. चोरीचा हा प्रकार १७ जून रोजी सायंकाळी पाच ते १८ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. किशोर बाजीराव लगड (वय ३१, रा. नाणेकरवाडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनचोरीचा आणखी एक प्रकार कुरुळी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. २१) दुपारी साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडला. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची २० हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर