पिंपरी : दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेला. एकूण चार लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. निगडी येथील यमुनानगर येथे गुरुवार (दि. २१) ते रविवार (दि. २४) दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सागर रमेश जंगम (वय ३३, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी जंगम यांचे राहते घर बंद असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा चार लाख ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
निगडीत घरफोडी करून साडेचार लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 18:50 IST